Monday, July 12, 2010

मोरपीस मी झाले रे..!

नील नभाच्या पंखावरती
होवुनी स्वार मी आले रे
नभमालेच्या मंडपात या
झड वर्षेची मी झाले रे
………..मोरपीस मी झाले रे..!
समीरासंगे धुंद होवुनी
दंवासवे मी झुलले रे
फुलपाखरु माझ्या मनीचे
अंगणी भिरभिरले रे
………..मोरपीस मी झाले रे..!
पिऊनी गंध तुझ्या प्रीतीचा
साज नवतीचा ल्याले रे
सुखही झाले असह्य आता
प्रेमसागरी तव न्हाले रे
………..मोरपीस मी झाले रे..!
मिठीत येता तुझ्या साजणा
गंधाळुन मी फुलले रे
गीत जन्मले आज प्रीतीचे
धुंदावुन जीवन गेले रे
………..मोरपीस मी झाले रे..!

विशाल

No comments:

Post a Comment