Monday, July 12, 2010

पाऊस…

रेखिल्या धरित्रीने अपुल्या भाळी
हिरव्या हिरव्या मऊ मखमाली
रानफ़ुलांची मनमोहक लाली
सजविली धरेने अपुल्या गाली
मंद सुरात रे गातो निर्झर…
…….आली वरुणाची स्वारी आली…
 
भेटाया सख्या प्रियकरा सजली
आरक्तता धरे तव गाली आली
लट वर्षेची केशांत माळली
मुखड्यावर तव पृथा भाळली
मंद स्वरात रे गातो निर्झर…
…….आली वरुणाची स्वारी आली….

भेटाया सागरा आतुर जाहली
साथ तिला वर्षेची लाभली
सवे नदीच्या तव प्रिया निघाली
घटिका मिलनाची समीप आली….
मंद सुरात रे गातो निर्झर….
…….आली वरुणाची स्वारी आली.

विशाल

No comments:

Post a Comment