Tuesday, July 27, 2010

चित्कला

आदिमाया ती आदिशक्ती
स्वयें चित्कला मायमुक्ती

ज्ञानराज सोपान मुक्तीचा
साधन ते अवघे निवृत्ती

मन मारुनी उन्मन करावे
ज्ञानराया शिकवली युक्ती

त्याग मायेचा मार्ग प्रभुचा
मिटविली चांग्याची भ्रांती

अहं नाम्याचा कच्चे मडके
गोरा म्हणे ती स्वयं भक्ती

क्लेश साहुनी क्षमा करावी
मुक्ती म्हणे मग मिळे शांती

नभात तेजें ज्योत उजळली
माय चित्कला मुक्त जाहली

या गाण्याला श्री. प्रमोदकाकांनी लावलेली चाल इथे ऐकता येइल..
विशाल

No comments:

Post a Comment