Tuesday, July 27, 2010

भूल…

खुळावले नयन, झाले धूंद
सख्या हळुवार तुझी चाहूल

संपले अवचित सारे भास
मनाला पडली कसली भूल

स्तब्ध जाहला, अवखळ वारा
वाजता तुझे नि:शब्द पाऊल

पाचोळ्याचा अन नाद देतसे
बघ उगा तुझ्या येण्याची हूल

विसरले श्वास, तुझाच ध्यास
तु असा कसा रे उंबर फूल

पांघरलेली गात्रांवर ओली
खुळावल्या दंवबिंदुंची झूल

विशाल

No comments:

Post a Comment