Monday, August 23, 2010

आक्रोश ...

*************************************

कोपर्‍यात रस्त्यांच्या कलेवर अहिंसेचे…
संपले दिवस बापु…, तुमच्या रामराज्याचे
आता उरली भयाण केवळ..,शांतता शेवटाची
किं गर्भ कोवळे हे उद्याच्या अनावर हिंसेचे?
रक्ताने भरली झाडे…, फळे शस्त्रांची….
किं पुरावे ते अमुच्या…? कोडग्या मुर्दाडपणाचे ….
द्वेशाने बरबटली मने .., वाहले पाट रुधिराचे
हे फक्त कोसळणे मानवतेचे ….
किं संपणे संवेदनांचे ?

******************************************
विशाल.

No comments:

Post a Comment