Thursday, October 28, 2010

चारोळी - ११

माणसाचं 'असणं'
दिसण्यात दिसत नाही
म्हणुनच असण्याला
दिसण्याइतकं महत्त्व नाही...

तु आलीस तेव्हा परसातली
निशिगंधाही डंवरली होती
कदाचित तिलाही...
सुखाची चाहूल लागली होती...!

तुला आठवताना आठवलं, माझंही
कधी कवितेशी नातं होतं...
नाही आठवत खुप जोर देवुनही
नक्की कधी ते नकळत तुटलं होतं....

आकाशाची उंची मोजण्याच्या नादात
भास्कराशी नजर भिडली
मनाच्या मोजपट्टीची मर्यादा मला
अगदी त्याच क्षणी उमजली...

माझी हाक ऐकुनही
तुझी पावलं नाही थबकली
अगदी तेव्हाच जाणवलं
आता सारी नाती संपली....

माझा हात सोडतानाही
काया तुझी थरथरली...
सगळं काही विसरताना,
माझी आठवणही नाही झाली?

जुळलंच नाही नातं
तर तुटण्याचा प्रश्न नाही
जुळलेलं नातं तुटलं
तर त्यासारखं दु:ख नाही....१

आभाळाएवढी माऊली
पांघरुन वावरतोय
आयुष्याच्या संघर्षात
तिचीच सावली....

तुझ्यापर्यंत पोचण्यासाठी मी
प्रत्येक दिशा चोखाळलेली
पोहोचल्यावर पाहतो तर...
परतीची वाटच खुंटलेली....!

No comments:

Post a Comment