Tuesday, March 29, 2011

माणसे....

**********************************************
परक्यास ना कधीही कळतात माणसे ही
अपुलीच आपल्याला छळतात माणसे ही...

आसू न ढाळतो जो, असतोच का सुखी हो?
हसतो तयावरी का जळतात माणसे ही?

चंद्रास का मिळावे हो श्रेय चांदण्यांचे
पाहून चांदणीला चळतात माणसे ही...

लाचार मानवाला लालूच देत माया
मायेस भाळुनीया ढळतात माणसे ही

दु:खात का करावी पर्वा कुणी सुखाची?
आसू बघून मागे वळतात माणसे ही

त्या सर्वव्यापकाची आहे कलाकृती ना?
त्याला तरी ’विशाला’ कळतात माणसे ही?वृत्त : आनंदकंद
लगावली= गागाल गालगागा गागाल गालगागा
*******************************************************

विशाल...

2 comments: