Friday, April 29, 2011

मिलन...

अस्मी यांच्या हरिहरेश्वरच्या पोस्टमधल्या एका फोटो वरुन सुचलेल्या काही ओळी. अस्मी यांची परवानगी न घेता हा फोटो वापरतोय क्षमस्व !मेघ सावळा का नभी एकटा?
तो वाट प्रियेची बघ, पाहतसे
विरह वेळा ही असह्य झाली
प्रियेवीण जगणे ते व्यर्थ असे

सखी प्रिया तव दूर वसुधा
आतुर मिलना मनी कळवळे
सरतील कधी, क्षण विरहाचे?
नभास वेड्या कधी ना कळे...

शल्य त्याचे कुणा ना कळले
हलकेच कसे नभ ओघळले?
विरह वेदना जळी बुडाली..
प्रतिबिंब नभाचे धरेस भेटले...

बघतो आपले प्रतिबिंब जळी
दूर उभा तो नभमंडलावरी..,
नसेच नशिबी भेट प्रियेची...
प्रतिबिंबे भेटती परी ऊरा-ऊरी

विशाल...

No comments:

Post a Comment