Tuesday, August 2, 2011

चांदणे...


******************************

काळोखपाणी गर्द आकाशी
चांदणेही त्यां लाजत नाही
उजळते मग रात्र काळी
शशिकरां विरह साहवत नाही

चांदण्याची बरसात ही तशी
आजकाल 'तशी' होत नाही
तू येतेस सखे चांदणे लेवुन
चांदण्यात मी तसा न्हात नाही..

चांदणे सखे शरदाचे कधी ते
पाहिल्याचे मज स्मरत नाही
असतेस तू नित्य सभोवती
चांदण्यात मन हे रमत नाही

हलकेच मिटता नयन तुझे
लाजतो प्राजक्त, उमलत नाही
भल्या पहाटे तुझे जागणे
मोगरीसही मग राहवत नाही


******************************


विशाल...

2 comments:

 1. हलकेच मिटता नयन तुझे
  लाजतो प्राजक्त, उमलत नाही
  भल्या पहाटे तुझे जागणे
  मोगरीसही मग राहवत नाही

  वाह वाह.. सुंदर !!

  ReplyDelete
 2. धन्यवाद मालक !

  ReplyDelete