Thursday, August 11, 2011

नकोसे मनाचे भुलावे अता


*************************************

बहाणे स्मरावे कसे कालचे?
कसे आवरावे पिसे कालचे?

तुझ्या लोचनांचे दुधारी सुरे...
विकल आठवांचे ठसे कालचे!

सरे रात्र, पुन्हा सतावे अशी...
चरे विस्मरावे कसे कालचे?

हसावे, रडावे, स्मरावे किती?
झरे.., आसवांचे जसे कालचे!

नकोसे मनाचे भुलावे अता
पुरे की ’विशाला’ हसे कालचे!

*************************************

लगागा लगागा लगागा लगा

विशाल

No comments:

Post a Comment