Friday, August 19, 2011

प्रिय आण्णांस......

***********************************
रात्र मोठी, काजव्याचा भास आहे
मात्र थोडा चांदण्याचा त्रास आहे

भ्रष्ट आम्ही, भ्रष्ट तो आचार झाला
शुद्धतेचा का तुम्हाला ध्यास आहे ?

मत्त सत्ता, माजला अंधार सारा
'सत्य'... आण्णा, फक्त अट्टाहास आहे

हात 'गांधींचा' नसे, हा घात आहे
आज 'गांधी' भक्षकांचा दास आहे

राजसत्ता राक्षसांची ढाल झाली
लोकशाहीला इथे गळफास आहे

काळजी घ्या मात्र थोडी आज आण्णा
भोवताली श्वापदांचा वास आहे

शायरीची हौस मोठी तुज 'विशाला'
वेदनेचा त्यात वाटा खास आहे !

*************************************

विशाल...

No comments:

Post a Comment