Wednesday, September 21, 2011

खरंच का रे, माझी वेळ चुकली ?

*********************************************
तसा मी नेहमीच भिजवतो रे...
पण काल मात्र चिंब भिजलो 
कालचा पाऊस म्हणाला...

ही वसुंधरा, तुम्ही माणसे, ते पशु-पक्षी
आतुरतेने वाट पाहता ना...
माझ्या भिजवण्याची !

पण मलाही जरा कंटाळाच आला होता
नेहमीच इतरांना भिजवण्याचा...
म्हणून या वर्षी लवकर आलोच नाही
शेवटी गंमत म्हणून त्याच्या शेतात बरसलो
म्हणलं पार भिजवून टाकावी जमीन...

पण खरं सांगू.., अवेळी आलेल्या
माझ्या स्वागतासाठी (की निषेधासाठी?)
कदाचित स्वत:च्याच नशिबाचं सांत्वन करण्यासाठी,
त्याचे डोळे पाझरायला लागले ....
आणि माझ्याही नकळत मीच चिंब भिजलो, शहारलो..!!

खरंच का रे, माझी वेळ चुकली ?

*********************************************

विशाल


No comments:

Post a Comment