Tuesday, June 5, 2012

पत्र लिही तू मला.....

फेसबुकवरील ’मराठी कविता समुहाच्या’ "कविता एक अनुवाद अनेक" या विषयांतर्गत लिहीलेली एक कविता.

मुळ कविता : शायर जफर गोरखपूरी
स्वैर भावानुवाद : विशाल कुलकर्णी

छळतील जेव्हा स्मृती माझ्या पत्र लिही तू मला ,
रुसुनी बसेल नीज नयनीची पत्र लिही तू मला

हसरा श्रावण नील तरुंच्या गर्द सावलीतला ,
अधीरा श्रावण कवेत घ्याया तृषार्त वसुधेला ,
कधी रातभर आतुर श्रावण छतावरी बरसला
असह्य जेव्हा दाह मनाचा, पत्र लिही तू मला

फडफडूनी जेव्हा साद घाली फांदीवरचे पान कधी
हळूच खुलवुनी जाई तुजला मोरपीस ते जुने कधी
रुद्ध करेल कंठ जेव्हा गत-स्मृतींचे अन वळण कधी
व्याकुळ श्वासही होतील जेव्हा..., पत्र लिही तू मला

अंधारुनी जेव्हा जाईल सगळे चित्र कधी डोळ्यापुढचे
लपेल नकळत चंद्रही कधी, मळभ नभी ते साचे
जाणिवातही एकाकीपण जेव्हा फेर धरुन नाचे
होतील जेव्हा नाती परकी तेव्हा..., पत्र लिही तू मला

***************************************************

मुळ कविता

जब मेरी याद सताए तो मुझे ख़त लिखना ।
तुम को जब नींद न आए तो मुझे ख़त लिखना ।। 

नीले पेड़ों की घनी छाँव में हँसता सावन,
प्यासी धरती में समाने को तरसता सावन,
रात भर छत पे लगातार बरसता सावन,
दिल में जब आग लगाए तो मुझे ख़त लिखना । 

जब फड़क उठे किसी शाख़ पे पत्ता कोई,
गुदगुदाए तुम्हें बीता हुआ लम्हा कोई,
जब मेरी याद का बेचैन सफ़ीना कोई,
जी को रह-रह के जलाए तो मुझे ख़त लिखना । 

जब निगाहों के लिये कोई नज़ारा न रहे,
चाँद छिप जाए गगन पर कोई सहारा न रहे,
लोग हो जाएँ पराए तो मुझे ख़त लिखना । 

- ज़फ़र गोरखपुरी

No comments:

Post a Comment