Tuesday, February 26, 2013

गझल माझी विखुरलेली.....

********************************************

सोबतीला रात्र होती, झोप केवळ हरवलेली
मी तसा जागाच होतो, रात्र ही अन जागलेली

खोडल्या त्या सर्व रेघा, वाळवंटी आखलेल्या
लाट गेली वाहुनी की, अंगुली सरसावलेली

माळलेला मोगरा, केसात तूझ्या साजरा मी
तगर माझ्या परसदारी, नांदते भारावलेली

गेटवेवर मेणबत्त्या आसवांच्या पाहिलेल्या
देवडी माझ्या घराची.., आजही अंधारलेली

आज मी फारा दिसांनी, जागलो कविता लिहाया
शोधताना काफिये का? गझल माझी विखुरलेली...


********************************************

विशाल कुलकर्णी 

No comments:

Post a Comment