Friday, March 7, 2014

उद्दाम

ना गावही तो राहिला ठाम पहिल्यासारखा
ना काळही भासे अता उद्दाम पहिल्यासारखा

त्या वादळाला सांग ना थांबायला आता जरा
प्रगतीस नाही वेग तो बेफाम पहिल्यासारखा

आता पुन्हा मिरवेन मी बुरखा जुना, समजा जुन्या
नाही जमाना राहिला बदनाम पहिल्यासारखा

झालो अता बघ मोकळा वागायला मजसारखा
ना राहिलो माझ्यात मी सुतराम पहिल्यासारखा

जगलोच जेत्या सारखा मृत्यूसही ललकारतो
भोगावया तय्यार मी परिणाम पहिल्यासारखा

विशाल

No comments:

Post a Comment