Tuesday, June 17, 2014

' मेघांचे चुंबन '


सुटे सावली, 'मी'पण हसले
गात्री हळवे श्वासही रुसले
कातर वेळा,  क्षण विरहाचे
गंध तनुचा, मनही फसले

क्षण-क्षण, हलके गुणगुणताना
समीरासंगे दरवळले
रात्र निळाई, श्यामल हिमकर
कण-कण, देहाचे अवगुंठन सरले

अलगद गात्री फुले शिरशिरी
सुटे कंप देहास मखमली
मिरवी धरा मेघांचे चुंबन
अस्तित्वाचे भान न उरले

विशाल...


No comments:

Post a Comment