Monday, August 9, 2010

हवे कुणाला?

हवी कशाला रित पुराणी

हवे कुणाला प्रश्न नवे…
जुनेच अपुले घाव बरे…,
अन वर्तमानाचे सुत्र हवे…!

हवे कशाला क्षितीज सारे,
हवी कुणाला धरा नवी…,
तुजपुरती मज चाकोरी बरी,
अन तूला जाणीव हवी …!

हवे कशाला पाश जुने…
हवे कुणाला स्वप्न सवे,
याद तूझी तरिही उरी..,
वळून पाहण्या कारण नवे…!

हवे कशाला स्वर्ग साती…
जगण्या कुणाला निमीत्त हवे,
एक तूझी ती मिठी खरी..,
सय तूझी अन उरात हवी..!

विशाल

No comments:

Post a Comment