Tuesday, August 3, 2010
स्वातंत्र्यवीर …!
या महान क्रांतिकारक देशभक्ताच्या जन्मदिनी माझे त्रिवार वंदन.
जागविले वीरा तू स्वत्व आमुचे
रणी सांडुनीया रक्त अपुले
‘स्वतंत्रते भगवति’ साद घालुनी
स्वये समग्र भारता आळवले
दिलेस बळ तू जनसामान्यांसी
मनी स्वाभिमानाचे बीज रोवले
‘अभिनव भारता’ जन्म दिधला
अन देशसेवेचे कंकण बांधले
सात समुद्र पादाक्रांत करुनी
घरात शत्रुच्या पाय रोवले
मार्सेलिसचे अदभुत त्याने
गात्रांत अमुच्या रक्त सळसळे
असहाय्य झाले काळे पाणी
देशप्रेम तव समर्थ ठरले
पतितपावन तू योगी मनाचा
सुधर्माचे तू सत्व शिकवले
कोटी कोटी तव प्रणाम वीरा
तू अमुचे जीवन उद्धरले
विशाल
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment