Wednesday, January 10, 2018
उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते
कां रक्त साचलेले पदरात लाल होते?
गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण
आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते
तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही
उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते
रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या
भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते?
येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे
हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते
© विशाल कुलकर्णी
गर्भात कोंडलेले मौनी सवाल होते
जीणे असह्य म्हणती जगणे न सोडती पण
आमीष ऐहिकाचे मनुजां कमाल होते
तुम्ही परंपरांची मिरवाल कौतुकेही
उरणार ना उद्या ते, जे सत्य काल होते
रस्त्यात सांडल्या अन मातीस प्राप्त झाल्या
भाळावरी कळ्यांच्या कुठले गुलाल होते?
येथे अतर्क्य सगळे निष्कर्ष वास्तवाचे
हतबुद्ध शायराचे फसले खयाल होते
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment