Tuesday, May 22, 2018
ये पावसा ...
त्या वाहत्या झऱ्याचा,
फेसाळल्या नभाचा
श्वासास गंध यावा
गंधाळल्या दिठीचा
तू भेटशी नव्याने
मी ही नवाच आहे
नात्यास रंग यावा
वेडावल्या जुईचा
तू चुंबशील का रे
वाऱ्यास धुंद ओल्या
वर्षेस मोह व्हावा
भेगाळल्या धरेचा
तो शुष्क कोरडासा
ओढा तसाच आहे
त्याला विसर पडावा
फेटाळल्या नदीचा
ओला वसंत म्हणजे
आमंत्रणे सुखांची
आनंद मग पहावा
मंदावल्या उन्हांचा
मग तृप्त अंबराला
हळवे उधाण यावे
जलदास स्पर्श व्हावा
धुन्दावल्या भुमीचा
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment