Friday, March 29, 2019
बयो
अंगावरच्या ...
हजारो-हजार सुरकुत्या सांभाळत
ती भिंतीचा आधार घेत उठली
खांद्यावरचा विरुन गेलेला
पदर सावरीत एक नजर तीने
भिंतीवरच्या तड़कलेल्या आरश्यात टाकली
आरश्यावरचे तडे फारच वाढलेत
नवीन आरसा आणायला पाहीजे
असे ती सकाळपासून सातव्यान्दा म्हणाली
आरश्यासमोरून दूर होताना, हळूच
स्वत:वरच हासली...
दारातल्या वांझ कपिलेच्या
डोक्यावरुन हात फिरवत म्हणाली..
"चालयचंच गो, तेवढ़ाच एकटेपणाला आधार !
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment