Friday, March 29, 2019

माझे हसे झाले......




पाजल्याने* तू मला माझे हसे झाले
निंदकाला पाहिजे होते तसे झाले

ग्लासला कोड़े गड्या पडले नवे आता
समजुतीने प्यायलो मग कायसे झाले?

उदर आ वासून बसले ओत ना अजुनी
संपला कोटा न अजुनी हायसे झाले

दुखवट्याची कोडगी किमया किती सांगू
सोवळे जे कालचे पिवुनी 'बशे' झाले

फक्त एखादाच वेडा सोबती असतो
आणण्या सिगरेट कोणी छानसे झाले

चाल बघता बेवड्याची वाटते, माझ्या
पाकिटावर पाशवी ते वार से झाले

मी दया माझी करोनी सोडली मदिरा
'बाळ' म्हणुनी यार माझे बारसे झाले

स्वप्न होते बार मध्ये बांधण्याचे घर
पूर्ण होता स्वप्न 'त्यांचे' कोळसे झाले

का गड्या तु बास म्हणतो पाहुनी प्याला
यार माझे नाव बघ बदनामसे झाले

• इथे 'मदिरा' वाचावे. ( हे उम्यासाठी आहे, त्याला भलतेसलते प्रश्न पडतात लगेच म्हणून) 😛

- इरसाल पनवेलकर

No comments:

Post a Comment