Wednesday, May 15, 2019

रुजवात



झाडांनी हळूवारपणे
जमिनीला गोंजारलं
सरसरणाऱ्या मुळांनी
तिला घट्ट मिठीत घेतलं
सळसळणारा वारा
गारेगार हजार हातांनी
झाड़ आणि मातीचं
ते मिलन स्पर्शू लागला
त्या स्पर्शाने झाड़ शहारलं
त्यावरून ओघळलेलं बीज
भुमीनं अलगद टिपलं
वळीवाचा पहिला थेंब
आणि झाडाच्या मुळाशी
रुजलेला ओला अंकुर
एका नव्या जीवनाची
जणु नवी रुजवात !

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment