Tuesday, August 3, 2010

लोटांगण

गुरूर ब्रह्मा, गुरूर विष्णू
गुरूर देवो सत्यसाईश्वरा
धावत आलो दिल्लीवरूनी
सरकारा तारा पट्टपुर्थीश्वरा ….

विजय जाहला, सत्ता आली
’खाती’ खाती हवी आम्हाला
घास मुखीचा निसटू पाहे
कृपा असावी पट्टपुर्थीश्वरा …

महान राष्ट्री भाऊबंदकी
लोणी हवे सारे आम्हाला
सावलीनेच धरला दावा
द्या वरदहस्त पट्टपुर्थीश्वरा …

पोहोच तुमची खालवर पुरती
हायकमांडही ढाळीते चवर्‍या
उद्दंड जाहला जाणता राजा
द्या समज त्यासी पट्टपुर्थीश्वरा …

नतमस्तक हो तुमच्यापुढती
दास खुर्चीचे पामर आम्ही
बुडत्या नौकेस हात द्यावा
घ्या दंडवत माझा पट्टपुर्थीश्वरा …

संदर्भ : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरुन धावत येवुन सत्यसाईबाबांची केलेली पाद्यपुजा.

विशाल.

No comments:

Post a Comment