Tuesday, August 3, 2010

ढेकर

वार – प्रतिवार…
शह – काटशह…,
अरे ला कारे….
नुसतेच सारे…,
शब्दांचे पसारे….!
नखं गळालेला जर्जर वनराज,
त्याच नखांनी परस्परांशी…,
झुंझताहेत छावे…!
सामर्थ्य, सत्ता …
अनुत्तरित…? प्रश्न अस्मितेचा (?)
विखुरलेले सारे कळप मेंढरांचे!
बलाबलावरुन भांडताहेत …
अनियंत्रित…,मेंढपाळ भरकटलेले!
त्यांचे राजकारण, फरफट कुणाची?
कुणीही यावे टिकली मारुन जावे
नियती आमची कधी बदलणार?
संतप्त, विव्हल …
गांधारीचे शाप …
आम्हालाही कायम भोवणार…!
आमच्याच भांडणात…
सत्तापिपासु लांडगे…
नेहमीच …,मेजवान्या झोडणार!
आम्ही तसेच उपाशी….
ते मात्र सुखाचा ढेकर देणार !


विशाल

No comments:

Post a Comment