Tuesday, August 3, 2010

स्वातंत्र्यवीर …!

Sawarkar
२८ मे…! स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस. २८ मे १८८३ साली जन्मलेल्या या महामानवाने भारताच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावुन ब्रिटीश राजवटीविरुद्ध रण छेडले होते. भारताच्या स्वातंत्र्यप्राप्तीत सिंहाचा वाटा असणार्‍या या महान क्रांतिकारकाचे असाधारण कर्तुत्व आज आपल्या स्वतंत्र (?) भारत देशातच दुर्लक्षित होत आहे.. हे आपले आणि अखंड भारतवर्षाचे दुर्दैवच म्हणावे लागेल.

या महान क्रांतिकारक देशभक्ताच्या जन्मदिनी माझे त्रिवार वंदन.

जागविले वीरा तू स्वत्व आमुचे
रणी सांडुनीया रक्त अपुले

‘स्वतंत्रते भगवति’ साद घालुनी
स्वये समग्र भारता आळवले

दिलेस बळ तू जनसामान्यांसी
मनी स्वाभिमानाचे बीज रोवले

‘अभिनव भारता’ जन्म दिधला
अन देशसेवेचे कंकण बांधले

सात समुद्र पादाक्रांत करुनी
घरात शत्रुच्या पाय रोवले

मार्सेलिसचे अदभुत त्याने
गात्रांत अमुच्या रक्त सळसळे

असहाय्य झाले काळे पाणी
देशप्रेम तव समर्थ ठरले

पतितपावन तू योगी मनाचा
सुधर्माचे तू सत्व शिकवले

कोटी कोटी तव प्रणाम वीरा
तू अमुचे जीवन उद्धरले

विशाल

No comments:

Post a Comment