Thursday, November 26, 2015

पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी ..


नव्या-जुन्या किती खुणा दिल्यात आंदणात मी
कळेल का कधी तुला, किती तुझ्या ऋणात मी

उगाच हट्ट भोवती रहायचा तुझा खुळा
किती पड़ाव बदलतो इथे क्षणाक्षणात मी

किती उरात घाव या, जखम तरी नवी हवी
सरे न आस कोणतीच झुंझतो रणात मी

क्षणोक्षणी पराजयास भेटतो सुखासुखी
पुन्हा मुकाट पेरतोच स्वप्न अंगणात मी

मरेन मी, सरेन मी, तरी इथे उरेन मी
अजिंक्य ना, अवध्य ना, तरी कणाकणात मी

विशाल ( २६-११-२०१५ )

1 comment: