Sunday, December 18, 2016
माणूस
माणसांना बदलण्याला वेळ कोठे लागतो ?
बदलण्याने काळ ही माणूस कोठे बदलतो?
नित्य येथे हातघाई अन लढाई प्राक्तनी
हारण्याचे लाख रस्ते, रोज आता शोधतो
भाकरीचे शोधताना चंद्र रस्ता हरवला
वाटमारी जीवनाची कोण येथे टाळतो ?
पोर कोणाची गुलाबी स्वप्न विकते हासुनी
नजर चुकवुन रोज मी ही काच का हो चढवतो?
पाठ थोपटते कुणीसे, लाज मग धिक्कारते
ओढुनी पडदे मनाचे मी स्वतःला शोधतो !
विशाल...
१९-१२-२०१६
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment