Tuesday, February 20, 2018
साधले तर वार कर .....
कोण जाणे रोज ओझे जीव कसले वाहतो
बंद डोळ्यांनी सुखाचे भोग कुठले भोगतो
वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी
मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो
अंबराची सांगता महती मला का सारखी?
मी इथे मातीतुनी दररोज इमले बांधतो
सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे
प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो
साधले तर वार कर या काळजावरती सखे
अन्यथा मी पाठ फिरवुन नेत्र हलके झाकतो
© विशाल विजय कुलकर्णी
बंद डोळ्यांनी सुखाचे भोग कुठले भोगतो
वाट चुकलेली कदाचित मागल्या वळणावरी
मी नवा उत्साह लेवुन गांव दुसरे शोधतो
अंबराची सांगता महती मला का सारखी?
मी इथे मातीतुनी दररोज इमले बांधतो
सावजाला ठाव असते नाव व्याधाचे इथे
प्राण घेताना बळीचे आर्त डोळे टाळतो
साधले तर वार कर या काळजावरती सखे
अन्यथा मी पाठ फिरवुन नेत्र हलके झाकतो
© विशाल विजय कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment