Friday, March 23, 2018

चहाडखोर...



स्वप्ने सुद्धा कधी-कधी
परक्यासारखी वागतात
चहाडखोर मित्रांसारखी
इकडचे तिकडे अन ...
तिकडचे इकडे करतात

आज सकाळी-सकाळी,
लगबगीने फोन केला तिला
मी काही बोलायच्या आतच म्हणाली
तू किनई...
रात्री स्वप्नात आला होतास
माझ्या बटांना सावरत म्हणालास
तू ना, आजकाल माझ्या स्वप्नात येतेस

खरेच सांगतोय,
स्वप्ने किनई ....... !

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment