Sunday, April 1, 2018

रडे रोज चंदन सहाणे सवे



***********************
पुन्हा चांदण्याचे बहाणे नवे
पुन्हा काजव्यांचे शहाणे थवे

पुन्हा रात्र जागर नवा मांडते
सखे चंद्र गातो तराणे नवे

पुरेशी न संगत तुझी ईश्वरा
मला आज सोबत दिवाणे हवे

तुझ्या मस्तकी गंध भगवे विठू
रडे रोज चंदन सहाणेसवे

पुन्हा पंख पसरुन पक्षी उडे
वळुन उंबऱ्याला पहाणे नवे

नको स्वर्ग मोक्षास जाणे नको
मला मायसंगे रहाणे हवे

विशाला, किती सोहळे टाळले
तुला ऐरणीचेच गाणे हवे

***********************

गण : लगागा लगागा लगागा लगा - वीणावती
© विशाल कुलकर्णी
०२/०४/२०१८







No comments:

Post a Comment