Friday, June 21, 2019
प्रवास ..
प्रवास ...
ती भेट अवेळी होती मात्र हवीशी होती
चुकलेल्या मूक क्षणांची याद जराशी होती
रस्त्यात बेगड़ी कुठले रंग पसरले होते
रक्त कसे ओघळले ती जखम उराशी होती
ती खोटे खोटे रुसली मीही उगाच फसलो
त्या सरल्या नात्याची का बोच तळाशी होती
रण सरले मग अवचित वळणावर कोसळताना
डोळ्यात तुझ्या सुकलेली ओल मनाशी होती
मी हरलो होतो त्या प्रत्येक लढाईमध्ये
अजुन उमगले नाही ती झुंज कुणाशी होती
छाटले पंख कुणीसे पक्षी जाय दिगंतरा
सावलीत पसरली तनु पण प्रित उन्हाशी होती
सरला प्रवास तेव्हा प्राजक्त उशाशी होता
थकल्या श्वासांसाठी ती पुष्कर काशी होती
© विशाल कुलकर्णी
ती भेट अवेळी होती मात्र हवीशी होती
चुकलेल्या मूक क्षणांची याद जराशी होती
रस्त्यात बेगड़ी कुठले रंग पसरले होते
रक्त कसे ओघळले ती जखम उराशी होती
ती खोटे खोटे रुसली मीही उगाच फसलो
त्या सरल्या नात्याची का बोच तळाशी होती
रण सरले मग अवचित वळणावर कोसळताना
डोळ्यात तुझ्या सुकलेली ओल मनाशी होती
मी हरलो होतो त्या प्रत्येक लढाईमध्ये
अजुन उमगले नाही ती झुंज कुणाशी होती
छाटले पंख कुणीसे पक्षी जाय दिगंतरा
सावलीत पसरली तनु पण प्रित उन्हाशी होती
सरला प्रवास तेव्हा प्राजक्त उशाशी होता
थकल्या श्वासांसाठी ती पुष्कर काशी होती
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment