Friday, June 21, 2019
पाऊस ... काल आणि आज !
आजकालचा पाऊस काही पावसासारखा येत नाही
क्लाऊड असले तरी त्याला लाऊड होता येत नाही
क्लाऊड असले तरी त्याला लाऊड होता येत नाही
तेव्हा पाऊस आला की बेडूक दिसायचे
छताच्या पन्हाळ्याला
पावसाचे दोर लोंबायचे
अंगणातल्या पिंपळावर
हिरव्यागार पालवीचे वेल चढायचे
सरसरणाऱ्या वाऱ्याचे परसात बोल घुमायचे
छताच्या पन्हाळ्याला
पावसाचे दोर लोंबायचे
अंगणातल्या पिंपळावर
हिरव्यागार पालवीचे वेल चढायचे
सरसरणाऱ्या वाऱ्याचे परसात बोल घुमायचे
पूर्वी पाऊस आला की..
संदुकीतल्या छत्र्या बाहेर यायच्या
छत्रीतल्या जोड्या रस्त्यावर दिसायच्या
दप्तराची ओझी आईबाबाच्या हाती
आणि पाण्यात छपाछप चिल्ली पिल्ली दमायची
संदुकीतल्या छत्र्या बाहेर यायच्या
छत्रीतल्या जोड्या रस्त्यावर दिसायच्या
दप्तराची ओझी आईबाबाच्या हाती
आणि पाण्यात छपाछप चिल्ली पिल्ली दमायची
पाऊस येतो बदाबदा आजही ..
पण आजकाल कोसळत नाही
घरंगळतो इमारतीच्या भिंतीवरुन , पण..
का कोण जाणे पूर्वीसारखा सोसवत नाही
छत्र्या हरवल्यात ..
कधीच विंडचिटरच्या गर्दीत
आता पाऊससुद्धा ...
कॉन्क्रीटच्या जगलात हरवतो
वाराच कसाबसा ट्रॅफ़िकमधुन वाट काढतो
पण आजकाल कोसळत नाही
घरंगळतो इमारतीच्या भिंतीवरुन , पण..
का कोण जाणे पूर्वीसारखा सोसवत नाही
छत्र्या हरवल्यात ..
कधीच विंडचिटरच्या गर्दीत
आता पाऊससुद्धा ...
कॉन्क्रीटच्या जगलात हरवतो
वाराच कसाबसा ट्रॅफ़िकमधुन वाट काढतो
आता पावसाच्या डबऱ्यातुन..
मित्राच्या अंगावर पाणी उडवत उड्या मारणे नाही.
एकाच छत्रीत ...
पावसाला फसवत दोघांनी भिजणे तर नाहीच नाही.
मित्राच्या अंगावर पाणी उडवत उड्या मारणे नाही.
एकाच छत्रीत ...
पावसाला फसवत दोघांनी भिजणे तर नाहीच नाही.
आज पाऊस ..
फक्त गटारातून तुंबतो
सबवेतुन साचतो आणि रेल्वेरुळावर रूळतो
पण तरीही पाऊस जीवंत आहे
कारण आजही तो माणसाच्या मनातून जागतो
आजही त्याच्या स्वप्नातून नांदतो
कधी आनंदाने तर कधी दुःखाने...
त्याच्या डोळ्यातून बरसतो...
फक्त गटारातून तुंबतो
सबवेतुन साचतो आणि रेल्वेरुळावर रूळतो
पण तरीही पाऊस जीवंत आहे
कारण आजही तो माणसाच्या मनातून जागतो
आजही त्याच्या स्वप्नातून नांदतो
कधी आनंदाने तर कधी दुःखाने...
त्याच्या डोळ्यातून बरसतो...
पाऊस नाही बरसत आजकाल पावसासारखा
पण माणूस त्याला आजही पावसासारखाच समजतो.
पण माणूस त्याला आजही पावसासारखाच समजतो.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment