Tuesday, September 10, 2019
जगण्याला कारण मिळते
जगण्याला कारण मिळते
पोर निजली मिटुन डोळे बाप सुखांचा धनी
आनंदे भिजले डोळे सुख झाले साजणी
इवल्याश्या मुठीत राणी मुग्ध स्वप्न कोणते?
भासती बोल बोबडे आनंदाच्या खाणी
ती येते तेव्हा अलगद बाप एक जन्मतो
देव तया जणु नभातुन असुयेने पाहतो
जोजवण्या आपली ईर्षा होतो अवतारी
कधी विठू, कधी ज्ञानबा माऊली म्हणवतो
लोचने अर्धी उघडी ओष्ठ गुलाबी सुमने
कुरळ्या केसांवरती हलकेच हात फिरवणे
ओठात हलके हलके ती नाजुक कुरकुरते
झोपेतच कुस बदलता हळूच खुदकन हसणे
गालावर खळी गोडशी लट कपाळी झुलते
मिठीत तिच्या जिवन फुलते संगीतही झरते
क्षणात रुसणे हळुच रडणे लटकेच बहाणे
गोडु गाली हसते अन जगण्या कारण मिळते !
© विशाल कुलकर्णी
पोर निजली मिटुन डोळे बाप सुखांचा धनी
आनंदे भिजले डोळे सुख झाले साजणी
इवल्याश्या मुठीत राणी मुग्ध स्वप्न कोणते?
भासती बोल बोबडे आनंदाच्या खाणी
ती येते तेव्हा अलगद बाप एक जन्मतो
देव तया जणु नभातुन असुयेने पाहतो
जोजवण्या आपली ईर्षा होतो अवतारी
कधी विठू, कधी ज्ञानबा माऊली म्हणवतो
लोचने अर्धी उघडी ओष्ठ गुलाबी सुमने
कुरळ्या केसांवरती हलकेच हात फिरवणे
ओठात हलके हलके ती नाजुक कुरकुरते
झोपेतच कुस बदलता हळूच खुदकन हसणे
गालावर खळी गोडशी लट कपाळी झुलते
मिठीत तिच्या जिवन फुलते संगीतही झरते
क्षणात रुसणे हळुच रडणे लटकेच बहाणे
गोडु गाली हसते अन जगण्या कारण मिळते !
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment