Saturday, September 5, 2020
शून्य
कुठेतरी दूरवर
अतिशय संथपणे
कुठल्यातरी
पुरातन,
सनातन
मंदिराची घंटा
अविरत वाजायला लागते
मंदिराला
कवेत घेवून बसलेल्या
त्या एकाकी नदीचे
क्षीण, मौन हाकारे
कानाचे पडदे टरकावत
थेट हॄदयापर्यंत पोचायला लागतात
...
...
आणि सुरू होतो
एक प्रच्छन्न कोलाहल
अस्तित्वाचा,
जिवा-शिवाचा,
मग माझा मी उरत नाही आणि...
कुठल्यातरी एका बेसावध क्षणी,
'मी'च उरत नाही....
उरते ती फ़क्त एक पोकळी, शून्य !
©विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment