Thursday, September 17, 2020
कालचा पाऊस वेगळाच होता !
कालचा पाऊस वेगळाच होता
अतृप्त तृणपर्णावर
थेंब थबकला नाही
गळा भेटूनही तयाला
पान्हावला ऊर धरेचा नाही
कालचा पाऊस वेगळाच होता
खिन्न, विषण्ण, थकलेला
आतवर दुखावलेला,
संमिश्र भावनांनी भिजलेला
उध्वस्त डोळ्यातून ओघळलेला
कालचा पाऊस वेगळाच होता
त्या डोळ्यातून नव्हती
हुरहुर ओझरत्या मिलनाची
सुकलेल्या पापणीवरती
चाहूल कदाचित विरहाची
डोळ्यात तिच्या साकळलेला
रेंगाळलेला...
अनवट पायवाटेवर !
कालचा पाऊस वेगळाच होता ...
कालचा पाऊस वेगळाच होता !
©विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment