Thursday, September 17, 2020

प्रियेस ...

 


कसा गंध ओला तुझ्या कुंतलांचा मिसळला अगा गात्रांत माझ्या

सखे बंध कसला कुण्या जाणिवांचा स्पर्शला जणू गात्रांस माझ्या


कसे गुंतले श्वास श्वासात ओल्या थांबले किती ओठांत माझ्या

पुन्हा आठवावे तुझे ते उसासे बिलगणे तुझे ओठांस माझ्या


पुन्हा पापण्यांचे तुझ्या ते बहाणे पुन्हा यार फसवे स्पर्श ओले

उगा चांदण्याचे किती ते तराणे पुन्हा आज ओठी तुझे नाव आले


जिथे सत्य स्वप्नात गुंतावयाचे तिथे भास सारे विरघळावे

तुझा हात हातात येताच माझे सखे विश्व अवघे  सावरावे


--- विशाल कुलकर्णी



No comments:

Post a Comment