Thursday, September 17, 2020
ओढ
शेकडो मैलाच्या
अंतरावरुन
साद घालणारा
प्रियेच्या
देहाचा तो गंध !
मागच्या भेटीत, तिच्या..
स्पर्शाने मोहरलेला मी
आणि माझ्या भेटीने...
बहरुन आलेली
तिची हिरवीगार काया !
नक्की कुठल्या कोण जाणे
पण कुठल्यातरी,
एका बेसावध क्षणी
मीच ...
पाऊस झालो.
आणि अचानक,
ती अनामिक ओढ ...
माझ्या थेंबाथेंबात रुजायला लागली
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment