Wednesday, April 27, 2022

स्थिर

 


चालले रे आयुष्य पुढे, जग बोलले हसुनी 

तू थांबला कसा रे, होता तिथेच अजुनी ?


ना खंत मला याची, की होतो तिथेच आहे

वटवृक्ष मी चिरंतन, मी आकाशा स्पर्शू पाहे


तिष्ठतो युगानुयुगे, मी पांथस्था देतो छाया

शांत होतसे दाह जगाचा, शितल हो काया


हा अंत नसे मित्रा, जाहलो आहे स्थिर इथे

हा विराम नाही, हो प्रारंभ नव्या युगाचा इथे 


जग जगते स्वांत-सुखास्तव जात राहते पुढे

हात द्यावया मदतीचा, पाऊल माझे सदा पुढे


विशाल उवाच...





No comments:

Post a Comment