Monday, January 22, 2018
गज़ल - वृत्त : तोटक
वृत्त - तोटक
अदमास पुन्हा चुकतात इथे
वनवास नवे मिळतात इथे
नकळत जगणे जगणे बनते
मिथके अलगद जुळतात इथे
रुसणे स्मरता हसणे स्फुरते
अलवार सुखे कळतात इथे
वळणे कळता सरते कुतुहल
नवखेच सखे फसतात इथे
हलकेच पुन्हा जवळीक नवी
सुमने कवळी फुलतात इथे
विरहास नवे सहवास हवे
हळवे क्षण ते स्मरतात इथे
भुतकाळ जरा विसरू म्हणता
इतिहास नवे रचतात इथे
© विशाल वि. कुलकर्णी
अदमास पुन्हा चुकतात इथे
वनवास नवे मिळतात इथे
नकळत जगणे जगणे बनते
मिथके अलगद जुळतात इथे
रुसणे स्मरता हसणे स्फुरते
अलवार सुखे कळतात इथे
वळणे कळता सरते कुतुहल
नवखेच सखे फसतात इथे
हलकेच पुन्हा जवळीक नवी
सुमने कवळी फुलतात इथे
विरहास नवे सहवास हवे
हळवे क्षण ते स्मरतात इथे
भुतकाळ जरा विसरू म्हणता
इतिहास नवे रचतात इथे
© विशाल वि. कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment