Monday, January 22, 2018
दाटला डोळ्यांत आहे पावसाळा नेहमी
सीट चौथी कां असे नशिबात माझ्या नेहमी
संयमाचा मंत्र कुठवर मी जपावा नेहमी
बायकोला उंबऱ्याची रोज महती सांगतो
साम्य समतेचे धडे देतो जगाला नेहमी
आरश्याला सांग आता सत्य तू बोलू नको
हर चुकीचा यंत्रणेला दोष द्यावा नेहमी
मेघ आले वा न आले, सोड चिंता फालतू
दाटला डोळ्यांत आहे पावसाळा नेहमी
बघ तुला जमलेच तर घ्यावी गज़ल मांडीवरी
अन्यथा मग जोजवावे काफियाला नेहमी
© विशाल कुलकर्णी
संयमाचा मंत्र कुठवर मी जपावा नेहमी
बायकोला उंबऱ्याची रोज महती सांगतो
साम्य समतेचे धडे देतो जगाला नेहमी
आरश्याला सांग आता सत्य तू बोलू नको
हर चुकीचा यंत्रणेला दोष द्यावा नेहमी
मेघ आले वा न आले, सोड चिंता फालतू
दाटला डोळ्यांत आहे पावसाळा नेहमी
बघ तुला जमलेच तर घ्यावी गज़ल मांडीवरी
अन्यथा मग जोजवावे काफियाला नेहमी
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment