Friday, March 23, 2018
........ कशाला ?
वृत्त : सती जलौघवेगा
लगालगागा लगालगागा लगालगागा
पुन्हा तुला मी क्षणोक्षणी सावरू कशाला
उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला
पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने
तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला
तिला जरासा हवा अबोला रुसावयाला
जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला
असे कसे बोलणे सखीचे मला कळेना
जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला
अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो
जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला
मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की
तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला
जगावयाला हवे कशाला नवे बहाणे
सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला
© विशाल कुलकर्णी
लगालगागा लगालगागा लगालगागा
पुन्हा तुला मी क्षणोक्षणी सावरू कशाला
उगाच ऐना बघून मी मोहरू कशाला
पुन्हा नभावर जरा दिसावी उनाड स्वप्ने
तुझे पसारे घडोघडी आवरू कशाला
तिला जरासा हवा अबोला रुसावयाला
जुनीच आहे सवय तिची बावरू कशाला
असे कसे बोलणे सखीचे मला कळेना
जरी तिचे वागणे दुटप्पी स्मरू कशाला
अजून सुद्धा तिच्याविना मी जगेन म्हणतो
जुनीच स्वप्ने पुन्हा अता वापरू कशाला
मरण मनोहर प्रिये तुझ्यासह असेल नक्की
तुझ्याविनाही जगेन मी घाबरू कशाला
जगावयाला हवे कशाला नवे बहाणे
सुखे तुझ्या सोबतीतली ठोकरू कशाला
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment