Sunday, April 1, 2018
पोर ...
कुणी गोजिरी पोर साजिरी
खळी गोडशी गाली पडते
पोटात भूक डोळ्यात ओल
दोरी वरती कसरत करते
खळी गोडशी गाली पडते
पोटात भूक डोळ्यात ओल
दोरी वरती कसरत करते
बाप वाजवी कसली टिमकी
माय बिचारी तिळतिळ तुटते
बघे तमाशा जनता सगळी
फेकुन दिडकी टाळ्या पिटते
माय बिचारी तिळतिळ तुटते
बघे तमाशा जनता सगळी
फेकुन दिडकी टाळ्या पिटते
डोळ्यांत तिच्या स्वप्न उद्याचे
तिला सुखाचे चित्र खुणवते
नाच कारटे हलवुन दोरी
बा ओरडता उदास हसते
तिला सुखाचे चित्र खुणवते
नाच कारटे हलवुन दोरी
बा ओरडता उदास हसते
केविलवाणी माय बघुनी
हळूच मग ती डोळे पुसते
बापाची मग माय होवुनी
जनते पुढती थाळ पसरते
हळूच मग ती डोळे पुसते
बापाची मग माय होवुनी
जनते पुढती थाळ पसरते
बाप बिचारा रडे मनातुन
दुःख लपवण्या डोळे मिटतो
आज घ्यायची तिची बाहुली
थोडी चिल्लर हसुन लपवतो
दुःख लपवण्या डोळे मिटतो
आज घ्यायची तिची बाहुली
थोडी चिल्लर हसुन लपवतो
वृत्त : पादाकुलक
© विशाल कुलकर्णी
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment