Monday, July 15, 2019
वारी
वारी
जाहली गर्दी सुखांची चंद्रभागेच्या तिरी
शोधण्या मग विठ्ठलाला देव आले अंबरी
टाळ चिपळ्याचा गजर ही गुंजला ध्यानीमनी
श्वास श्वासांना म्हणाले क्षेत्र पावन पंढरी
रुक्मिणीसंगे विठोबा ज्ञानदेवा भेटले
नाम घेता भक्त विठुच्या प्रेमरंगी रंगले
सोबती आहे तुकोबाच्या अभंगाचा गजर
पंढरीच्या वाळवंटी वैष्णवांचे सोहळे
रुक्मिणी ती एकटी कंटाळलेली मंदिरी
लेकरांची भेट घ्याया धावली रस्त्यावरी
वाळवंटी नाचणारे विठ्ठल बघुन साजिरे
खंत सारी विसरुनी मग शांत झाली अंतरी
मग दिठीला लाभली ब्रह्मनेत्रांची कळा
पंढरीच्या आसमंती मात्र उरला सावळा
माय रखुमा सिद्ध होई लेकरांना भेटण्या
काय सांगू थाट देवा दिव्य तोची सोहळा !
© विशाल कुलकर्णी
जाहली गर्दी सुखांची चंद्रभागेच्या तिरी
शोधण्या मग विठ्ठलाला देव आले अंबरी
टाळ चिपळ्याचा गजर ही गुंजला ध्यानीमनी
श्वास श्वासांना म्हणाले क्षेत्र पावन पंढरी
रुक्मिणीसंगे विठोबा ज्ञानदेवा भेटले
नाम घेता भक्त विठुच्या प्रेमरंगी रंगले
सोबती आहे तुकोबाच्या अभंगाचा गजर
पंढरीच्या वाळवंटी वैष्णवांचे सोहळे
रुक्मिणी ती एकटी कंटाळलेली मंदिरी
लेकरांची भेट घ्याया धावली रस्त्यावरी
वाळवंटी नाचणारे विठ्ठल बघुन साजिरे
खंत सारी विसरुनी मग शांत झाली अंतरी
मग दिठीला लाभली ब्रह्मनेत्रांची कळा
पंढरीच्या आसमंती मात्र उरला सावळा
माय रखुमा सिद्ध होई लेकरांना भेटण्या
काय सांगू थाट देवा दिव्य तोची सोहळा !
© विशाल कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment