Monday, September 2, 2019

कान्हा ..

मीच राधा मीच कान्हा भेद कोणी जाणिले ना
अलगुजाची साद येता मीच माझी राहिले ना
रंग अवघा एक झाला कृष्ण राधा भेद नुरला
विरघले कृष्णात अलगद भान कसले राहिले ना

सावळ्या रंगात रंगुन विश्व सारे कृष्ण झाले
कृष्ण झाली ही हवा आकाश होई सावळाले
देह सारा होय राधा श्वास झाले कृष्ण माझे
या सुखांनो कवळण्या मज दुःख माझे कृष्ण झाले

© विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment