Tuesday, October 13, 2020
गाणे ...
भल्या पहाटे रावे उठती
गाणे आनंदाचे गाती
सुर लेवून येतो पाऊस
चंदनगंधित होते धरती
खुल्या अंबरी चांदणन्हाणी
ओलेती मुग्ध रातराणी
चिंब चांदणगंधित पाऊस
चंद्र गातसे कुठली गाणी ?
हर्षित होती मुक्त काजवे
तेजाचे ते उन्मुक्त थवे
बरसते मन होते पाऊस
वाहुन जाय अंधार त्यासवे
सावीच्या किरणांतुन कोणी
तेजाचे घट मिरवत राणी
उजळतो तेजाने पाऊस
सुखे छेडतो आनंद गाणी
© विशाल विजय कुलकर्णी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment