Saturday, September 16, 2023

बरेच काही ...

 बरेच काही...


बरेच काही दडले आहे

बंद बोलक्या दारामागे

किती पसारे प्रश्नांचेही

बंद मुग्धश्या मौनामागे 


बरेच काही घडले आहे

स्तब्ध थांबल्या काळामागे

किती पिसारे आठवणीचे

सुप्त कोवळ्या स्वप्नांमागे


बरेच काही अडले आहे

शुष्क ओलसर ओठांमागे

किती किनारे भावनदीचे

मौन साधल्या डोळ्यांमागे


पुन्हा नव्याने जडले आहे

वेड अनोखे जगण्यामागे

पुन्हा सुखांचे गांव नव्याने

तुझ्या बोबड्या बोलांमागे 


© विशाल विजय कुलकर्णी

No comments:

Post a Comment