Wednesday, July 31, 2024

शोध


फार काही नकोय,

फक्त तुझ्या हातातलं,

पुस्तक होवू देशील का मला?

नाही वाचलंस तरी चालेल,

पण दिवसातून एकदा..

एकदाच;

मन भरून वास घेत जा

आता; कोऱ्या झालेल्या पानांचा.

शब्द नाहीयेत आता तिथे,

कधीकाळी.., कविता होत्या म्हणे...

आता निव्वळ एक पोकळी उरलीय. 

एकेक कविता,

पुन्हा नव्याने शोधावी म्हणतोय...

पाऊस आला, 

की कवितांना पुन्हा

नव्याने फुले येतात म्हणे.

तू आठवणीने वास घेत जा त्या पानांचा

ज्या दिवशी तुला कवितेचा वास येईल,

माझा शोध संपेल...

कदाचित !


©विशाल कुलकर्णी

No comments:

Post a Comment