Wednesday, July 31, 2024
आनंदगाणी
घन ओले ओघळलेले
ओलेत्या दंवात भिजले
मल्हार नभात रंगला
शुभ्र-काळे मेघ सजले
मग वारा गातो गाणी
रुसूनी बैसले कोणी
होता स्पर्श मधुगंधी
मोहरुन गेले कोणी
हिरवे तरू रानोवनी
हिरवाई पानोपानी
ओलेती साजणवेळा
लाजेने भिजली सजणी
नभ अंबरी दाटलेले
भेटण्या प्रियेला नटले
गंधाळली वसुधा हिरवी
वृक्षगर्भी ओज ओले
रस्ते भिजले आनंदे
आनंद पसरला रानी
गाती झाडे प्रेमाने
प्रितीची आनंदगाणी
©विशाल कुलकर्णी (३१.०७.२०२४)
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment