Thursday, November 21, 2024

एकटा

 एकटा 


गळा कंठ दाटे रिती पोकळी 

उरातून पाझरे गीत ओले, 

कशी मौक्तिके गंधाळलेली 

किती शब्द नि:शब्द मोकळाले. 


दाटले मात्र कधी श्वास माझे 

पुन्हा स्तब्ध झाले उगा अंतरी,

पुन्हा आज लाट डोळ्यात ओली 

मनाच्या तळाशी कुणी सुर मारी.


सुखे आठवांना कुणी स्पर्शले 

क्षुब्ध व्यथांना गोंजारले कुणी,

इथे या जगाची निराळी कथा 

वेदने, तुजला पुकारले कुणी. 


दिगंतात पक्षी उडे एकटा 

कधी शोधतो नदीचा किनारा, 

कातळडोही कधी ठाव घेई 

कधी होतसे स्वतः एक तारा.


विशाल उवाच…


No comments:

Post a Comment